OUR STORY

BREAST CANCER AND MAMMOGRAPHY

डॉ. सुरेखा खेडेकर

स्त्रियांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणे व तिला नीट सांभाळणे आवश्यक आहे. विशेषतः स्तनांची काळजी घेताली पाहिजे. कारण अंदाजे ९ पैकी एका स्त्रीला स्तनांचा कर्करोग होण्याची शक्य असते.

स्तनांच्या काळजीची ,, ..खालीलप्रमाणे :


अ) स्त्रीने स्वतः वेळोवेळी स्वतःची केलेली स्तनचिकीत्सा

आ) तुमच्या डॉक्टरने केलेली परीक्षा ( ही ४० व्या वर्षापासून सुरु करू शकता)

इ) MAMMOGRAPHY चिकीत्सा

ढोबळ सूचना :

स्त्रीने स्वतःच स्वतःची स्तन-परीक्षा कशी करायची हे शिकून घ्यायला पाहिजे. ही परीक्षा अगदी लौकर, म्हणजे वयाच्या २० व्या वर्षापासून सुद्धा सुरु करू शकता.

त्यात या गोष्टींकडे नीट लक्ष द्या.: त्वचेतील बदल, कुठे गाठ आली आहे का, स्तनाग्र आत खेचले गेले आहे का, स्तनाग्रातून स्त्राव  किंवा पूर्वींच्या चिकीत्सेत व आता काही नवीन बदल आढळतात का?

MAMMOGRAPY म्हणजे काय ??

न्युमोनिया झाला असताना ज्याप्रमाणे X-RAY काढतात, त्याचप्रमाणे, स्तनांच्या X-RAY ला MAMMOGRAM ( माम्मोग्राम) म्हणतात. स्तनाच्या कर्करोगाचे त्यामुळे लवकर निदान होऊ शकते. लवकर उपाय करता येतात व रोगी वाचण्याची शक्यता वाढते. १० प्रतिशत रोग्यांचे कर्क-रोग या माम्मोग्राम वरसुद्धा दिसत  नाहीत, त्यामुळे आपल्या डॉक्टरच्या सूचना पाळणे व सल्ला ऐकणे अत्यावश्यक असते.

ACR ( American college of Radiology) व FDA यासारख्या संस्था माम्मोग्राफी करणाऱ्या संस्थांवर सतत लक्ष ठेवतात आणि नियंत्रणही ठेवतात. त्यामुळे अशाच संस्थांकडे माम्मोग्रामसाठी जाणे हितावह आहे. तिथे प्रथम आपला insurance नक्की घेतात का हे पहा. डॉक्टरकडे जाताना पूर्वी केलेल्या अशा चाचणींचे reports ,CDs ,x-ray फिल्म्स, MRI ,ULTRASOUND वगैरे बरोबर नेणे अत्यावश्यक आहे.

हल्ली नवीन आलेल्या मशीनमध्ये DIGITAL MAMMOGRAPHY WITH CAD वापरतात. ती अधिक चांगली असतात.

स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण पुढील गटातल्या स्त्रियात अधिक आढळते:

१) घरातील (BLOOD RELATIIVES) नातेवाईकाना  पूर्वी स्तनांचा कर्करोग झाला असेल तर.

२) स्वतःला कुठलाही कर्करोग पूर्वी झाला असेल किंवा एका स्तनात पूर्वी कर्करोग झाला असेल तर.

३) लहान वयात पाळी सुरु झाली असेल (EARLY MENARCHE ) किंवा पाळी उशिरा बंद झाली असेल तर (LATE MENOPAUSE).

४) पहिले मूल ३५ वर्षानंतर झाले असेल किंवा मुले झालीच नसतील तर.

५) ETHNICITY

६) स्थूलपणा , खाण्यात जास्ती तेल-तूप किंवा चरबीयुक्त पदार्थ असतील तर.

७) ESTROGEN , EXPOSED TO EXCESSIVE RADIATION ETC .
ULTRASOUND कशाला म्हणतात ?

यात ध्वनीलहरींचा उपयोग करून छायाचित्रे घेतली जातात. विशेषकरून लहान/तरुण वयातील स्त्रियांच्या परीक्षेसाठी, किंवा MAMMOGRAPHY त दिसलेली गाठ cyst आहे की नाही ,हे कळण्यासाठी व त्या गाठीतून रक्तवाहिन्या जात आहेत की नाही हे पहाण्यासाठी.

MRI ( Magnetic Resonance Imaging ) कशाला म्हणतात त्याचा उपयोग काय?

यात चुंबकीय क्षेत्राचा (magnetic field) उपयोग करून छायाचित्रे घेतली जातात.

 

१) जेव्हा MAMMOGRAPHY किंवा ULTRASOUND मध्ये आढळली नाही किंवा दिसली नाही,तरीही एखादी गाठ संशयास्पद वाटते, तेव्हा अधिक निदान करण्यासाठी या मार्गाचा उपयोग होतो.

२) किंवा झालेला कर्करोग आजूबाजूला पसरला आहे अथवा दुसऱ्या स्तनात पण पसरला/झाला आहे का हे   पाहण्यासाठी,

३) किंवा अशा रोग्याना शस्त्रक्रिया, CHEMOTHERAPY किंवा RADIATION TREATMENT नंतर FOLLOW -UP करतासुद्धा MRI करतात.

यामध्ये  IV GADOLINIUM चे INJECTION देतात.

NUCLEAR MEDICINE ची पद्धत का केव्हा वापरतात ?

जशी हृदयासाठी NUCLEAR  MEDICINE ची CARDIAC STRESS TEST करतात, तशीच कर्करोग परीक्षेसाठीदेखील MIRALUMA चे INJECTION देऊन छायाचित्रे घेतली जातात. यामुळे अधिक उपयुक्त माहिती मिळू शकते.

तुमची MAMMOGRAPHY झाल्यानंतर तुमच्या डॉक्टरशी संवाद साधणे व निकाल समजून घेणे महत्वाचे आहे. कर्करोगाचे निदान झाले असेल तर, तुम्हाला BIOPSY करता RADIOLIGIST कडे (LOCALISATION FOR SURGEON OR STERIOTACTIC BIOPSY), किंवा BREAST SURGEON कडे पाठवले जाईल.

शस्त्रक्रिया करून गाठ/ कर्करोग  काढल्यानंतर तुम्हाला CHEMOTHERAPY किंवा RADIATION THERAPY ची गरज आहे किंवा नाही हे ठरवण्याकरता ONCOLOGIST कडे पाठवले जाते.

या सर्व उपाययोजना (TREATMENTS) झाल्यानंतरसुद्धा, पुन्हा तिथे कर्करोग उद्भवत नाही याची खात्री करून घेण्यासाठी MAMMOGRAPHY नियमितपणे करणे आवश्यक आहे.

पुरुषानासुद्धा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो व तो स्त्रियांपेक्षा अधिक वेगाने पसरू/वाढू शकतो,  म्हणून तसा संशय आल्यास त्यांनी त्वरित डॉक्टरकडे गेले पाहिजे.

DISCLAIMER :

हा लेख केवळ आपल्या माहितीसाठी आहे. प्रत्येकाने तपासणीसाठी आपल्या डॉक्टरकडे जाणे व त्याचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे वागणे हे जरुरीचे व आवश्यकच आहे.

 

– By सुरेखा खेडेकर, M.D.

(Diagnostic Radiologist )

 

This article was originally published in Rangadeep Diwali Ankk, published from NYC and NJ.

 

Leave a Reply